डाव्या कालव्यातून भीमा नदीत पाणी, चासकमानमधून ८५० क्युसेक्सने विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:48 AM2018-11-04T00:48:45+5:302018-11-04T00:50:31+5:30

खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे शनिवारी दुपारी १ वाजता खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भीमा नदीपात्रात ३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले.

 Water in the river Bhima through the left canal, 850 Cusecs from Chasman, | डाव्या कालव्यातून भीमा नदीत पाणी, चासकमानमधून ८५० क्युसेक्सने विसर्ग

डाव्या कालव्यातून भीमा नदीत पाणी, चासकमानमधून ८५० क्युसेक्सने विसर्ग

Next

चासकमान  - खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे शनिवारी दुपारी १ वाजता खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भीमा नदीपात्रात ३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले.
चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे खेडसह शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार शुक्रवारी सकाळी १० वाजता टेल टू हेड या पद्धतीने ४०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले होते. परंतु शनिवारी विसर्जन वाढवून भीमा नदीपात्रात ३०० व कालव्याद्वारे ५५० असे धरणामधून एकूण ८५० क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला आहे. डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले हे पहिले आवर्तन रोटेशन पद्धतीने सोडले जाणार आहे. पहिले रोटेशन पन्नास दिवसांचे व दुसरे रोटेशन सलग पंचेचाळीस दिवसांचे असणार आहे. पहिले आवर्तन कालव्याद्वारे एकूण ९५ दिवस चालणार आहे.
खेड तालुक्यातील भीमा नदीपात्रातील पाणी संपुष्टात आल्याने पश्चिम भागातील चास, आखरवाडी, कडूस, नेहेरेशिवार, मोहकल, कडधे, पांगरी, कान्हेवाडी आदींसह परिसरातील रब्बी हंगामात नदी अंतर्गत घेण्यात आलेली शेतकºयांची पिके धोक्यात आली होती.

पूर्व भागातील तसेच काळूस, संगमवाडी, शेलपिंपळगावसह पूर्व भागातील शेतकºयांनी भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी २९ तारखेला काळूस व शेलपिंपळगाव येथील शेतकºयांची उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक ५ कार्यालयाला घेराव घातला होता.
अखेर उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक कार्यालयाने या पत्राची दखल घेत तदनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाची दखल घेऊन येत्या चार ते पाच दिवसांत प्राधान्याने या बंधाºयांमध्ये पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर शेतकºयांनी घेराव मागे घेतला होता.
याअनुषंगाने खेडसह तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार ३ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता भीमा नदीपात्रात आवर्तन सोडण्यात आले आहे.

Web Title:  Water in the river Bhima through the left canal, 850 Cusecs from Chasman,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे