गळतीमुळे बंधारा पडला कोरडा, कोरेगाव भीमाला पाणीटंचाईची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 02:39 AM2018-04-07T02:39:35+5:302018-04-07T02:39:35+5:30
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा मोठ्या प्रमाणावर गळत असल्याने ऐन नदीपात्रातील पाणीसाठा खालावला. सध्या बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे.
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा मोठ्या प्रमाणावर गळत असल्याने ऐन नदीपात्रातील पाणीसाठा खालावला. सध्या बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे. पाणीपातळी खालावल्याने नळपाणी पुरवठ्याच्या विहिरीची पातळीही खालावली असल्याने गावचा पाणीपुरवठा अडचणीत आला असल्याने पाटबंधारे विभागाने तत्काळ नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी केली.
कोेरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील नळपाणी पुरवठ्याची विहिर वढू खुर्द हद्दीमधील नदीपात्रात आहे. या विहिरीतून पाणी शुद्ध
पाणी प्रकल्पात आणून नंतर टाक्यांमध्ये साठविण्यात येत आहे.
त्या टाक्यांमधून दोन जीआय पाईपमधून पाणी गावामध्ये आणण्यात येत आहे. गावाची लोकसंख्या जवळपास २२ हजारांच्या दरम्यान असल्याने मोठा पाणीसाठा आवश्यक असतो. कोरेगाव हद्दीत कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे. मात्र, हा बंधारा असून नसल्यासारखा असल्याचे चित्र आहे.
या बंधाऱ्याच्या प्रत्येक गाळ्यातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असलयाने पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे पाणीपातळी खालावल्याने कोरेगाव भीमाचा पाणीपुरवठा सध्या अडचणीत आला असल्याने नागरिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे.
तत्काळ पाणी सोडा : कुसुम मांढरे
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील बंधाºयाच्या गळतीमुळे नदीपात्राची पाणीपातळी खालावली असून कोरेगावचा पाणीपुरवठा अडचणीत आला असून, शेतकºयांना ऐन हिवाळ्यात पाणी कमी पडू नये यासाठी तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले असल्याचे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी सांगितले असून ढापे दुरुस्त करताना तत्काळ गळती थांबविण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
बंधाºयांना ढापे मिळणार का?
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील बंधाºयाच्या प्रत्येक गाळ्यातून मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. बंधाºयाचे ढापेही पूर्णत: गंजून पत्रा सडला असल्याने ढाप्यांचे अनेक ठिकाणी सांगांडेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे बंधाºयांना नवीन ढापे मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
बंधाºयाची तत्काळ दुरुस्ती करण्याची व नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली. या वेळी ग्रामस्थांनी बंधाºयाची पाहणी करून पाटबंधारे विभागाच्या निदर्शनाला बंधाºयाची गळती आणून दिली.
- राजेंद्र सात्रस, ग्रामविकास अधिकारी, कोरेगाव भीमा
दोन दिवसांत बंधाºयाची गळती थांबविण्यात येणार असल्याचे सांगून नळपाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी तत्काळ पाणी सोडण्याची तरतूद केली आहे.
- भारत बेंद्रे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग