ऊस लागवडीवर पाणीटंचाईचे सावट

By admin | Published: June 29, 2017 03:27 AM2017-06-29T03:27:08+5:302017-06-29T03:27:08+5:30

नीरा खोऱ्यातील साखर कारखान्यांचा आडसाली ऊस लागवड हंगाम दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

Water scarcity in sugarcane cultivation | ऊस लागवडीवर पाणीटंचाईचे सावट

ऊस लागवडीवर पाणीटंचाईचे सावट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोमेश्वरनगर : नीरा खोऱ्यातील साखर कारखान्यांचा आडसाली ऊस लागवड हंगाम दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, पाऊस लांबल्याने या ऊस लागवडींवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात नीरा डावा कालवा बंद झाला तरीही शेतकऱ्यांनी विहिरी व बोअरवेलच्या सोय केल्या आहेत. त्यामुळे या तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात १ जुलै व ७ जुलैला ऊस लागवड दरवर्षीप्रमाणे होईल.
मात्र सध्या नीरा डाव्या कालव्याला पाणी नाही, पाऊस नाही. त्यामुळे विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी घटली आहे. परिणामी ऊस लागवडी होऊ शकणार नाहीत. पाऊस चांगला झाला तर नीरा खोऱ्यात १५ हजार एकरांच्या आसपास आडसाली ऊस लागवडी केली जाते. कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात पाऊस पडला नाही. तरीही शेतकरी नीरा देवधर, भाटघर व वीर या तीन धरणांच्या भरवशावर ऊस लागवडी करत असतो. मात्र, जून महिना संपला तरीही धरण क्षेत्रात पावसाचा एक थेंबही पडला नाही.
सध्या नीरा देवघर धरणात ६.८० टक्के, भाटघर धरणात ४.२९ टक्के,तर वीर धरणात ४.५८ टक्केपाणीसाठा उरला आहे. तो पाणीसाठा पालखीसाठी पिण्यासाठी राखून ठेवलेला असतो. त्यामुळे ऊस लागवडीसाठी आता नीरा डाव्या कालव्याचे पाणी मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या आवाक्यात मोठा ऊस व नवीन ऊस लागवड जगवणे अवघड जाणार आहे, अशा शेतकऱ्यांनी नवीन ऊस लागवडीचे काहीसे क्षेत्र कमी केले आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची उपलब्धता नाही, अशा शेतकऱ्यांनी पाऊस पडेपर्यंत ऊस लागवड करण्याचा निर्णय लांबणीवर
टाकला आहे.

Web Title: Water scarcity in sugarcane cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.