आंबेगावच्या आदिवासी भागात पाणीटंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:18 AM2021-05-05T04:18:03+5:302021-05-05T04:18:03+5:30
डोंगरमाथ्यावरील पाणवठे आटले आहेत. दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्यांत वाढ, पशुपक्ष्यांनाही घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. डोंगरमाथ्यावरील दुर्गम आदिवासी ...
डोंगरमाथ्यावरील पाणवठे आटले आहेत. दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्यांत वाढ, पशुपक्ष्यांनाही घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. डोंगरमाथ्यावरील दुर्गम आदिवासी गावे व वाड्या-वस्त्यांवरील पाणीसाठ्यांनी तळ गाठले आहेत. माणसांबरोबरच पशू- पक्ष्यांनाही घोटभर पाण्यासाठी वणण करावी लागत आहे.
माथ्यावर रणरणते उन, तर पायाखालचा फुफाटा तुडवत बाया-बापड्यांचे हंडाभर पाण्यासाठी जंगलातील झऱ्यांवर हेलपाटे सुरू झाले आहेत. दूषित पाण्यामुळे आदिवासी भागात आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे, तर
पाणीटंचाईच्या समस्येबरोबरच आदिवासी भागात आरोग्याच्या समस्यांचाही नागरिकांना सामना करावा लागत आहे. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. यामुळे पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. विशेष करून तालुक्याच्या आदिवासी भागातील डोंगर माथ्यावरील गावे व वाड्यावस्त्या तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक पाणवठे आटल्याने माणसांबरोबरच पशुपक्षी व जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तळे, विहिरी, पाणवठ्यांत जेमतेम शिल्लक असणारे पाणी दूषित झाले असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नही अजून एक समस्या निर्माण झाली आहे. दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्या तसेच बॅक्टेरियांमुळे आजारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाटण खोऱ्यातील कुशिरे, महाळुंगे, दिगद, पिंपरी या गावांच्या आदिवासी वाड्यावस्त्या तर बोरघरच्या डोंगरावरील वाड्यावस्त्या, तिरपाड, कोंढरे, पिंपरगणे, नानवडे, न्हावेड, भोईरवाडी या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जेमतेम शिल्लक असणारे पाणीही दूषित होऊ लागले असून हेच पाणी पिऊन सध्या ग्रामस्थांना दिवस काढावे लागत आहेत. गोहे गावच्या डोंगरमाथ्यावरील उपळवाडी, सायरखळा, उभेवाडी, गाडेकरवाडी तसेच पोखरीची बेंढारवाडी या भागात सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
एकंदरीतच यंदा आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील नागरिकांबरोबरच पशुपक्षी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पावसाळा सुरू होण्यास अजून महिनाभर बाकी आहे. टँकर सुरू करण्याचे नव्याने प्रस्ताव दाखल होऊ लागले आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात पाणीटंचाई जाणवू लागली असून, हंडाभर पाण्यासाठी बायाबापड्यांची पायपीट
सुरू झाली आहे. पशुपक्ष्यांचे जीवही घोटभर पाण्यासाठी कसावीस होत आहेत.
छायाचित्र-कांताराम भवारी.