वॉटर पार्कमध्ये पाण्याची उधळपट्टी

By admin | Published: April 23, 2016 12:42 AM2016-04-23T00:42:30+5:302016-04-23T00:42:30+5:30

पाणी वापराबाबत जनजागृतीचा अभाव, पाण्याचा अपव्यय यामुळे पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे.

Water scarcity in water park | वॉटर पार्कमध्ये पाण्याची उधळपट्टी

वॉटर पार्कमध्ये पाण्याची उधळपट्टी

Next

चिंचवड : पाणी वापराबाबत जनजागृतीचा अभाव, पाण्याचा अपव्यय यामुळे पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे. पाणी कपातीसाठी एकीकडे महापालिकेने जलतरण तलाव बंद करण्याचा निर्यण
घेतला. मात्र, दुसरीकडे खासगी
वॉटर पार्कमध्ये दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी नेमक कुठून येते, याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे.
महापालिकेने तीन आठवड्यांपूर्वी जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, खासगी वॉटर पार्क अजूनही सुरूच आहे. दररोज लाखोलीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत उन्हामुळे अंगाची लाही लाही होते. यामुळे अबालवृद्ध पाण्यात पोहून उन्हचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, यंदाच्या सुट्टीत तरण तलाव बंद असल्याने सर्वजण वॉटर पार्ककडे वळाले. दरवर्षीपेक्षा यंदा वॉटर पार्कला जास्त गर्दी होऊ लागली आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना केवळ पैसे कमविण्यासाठी कोणताही विचार न करता वॉटर पार्क सुरूच ठेवले आहेत. रेन डान्स, वेव पूल, डिजे डान्स यासह विविध राईड्समध्ये पाण्याचा वापर केला जातो. पाण्याशिवाय या राईड्स चालूच शकत नाही. शहरात होणारी पाणीटंचाई लक्षात घेता वॉटर पार्कच्या माध्यमातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
जलतरण तलाव बंद केल्याने पाणी वाचेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु वॉटर पार्कमध्ये राजरोसपणे पाण्याचा अपव्यय सुरू आहे. याबाबत अद्याप कोणीही आक्षेप घेतलेला नाही. राज्यातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असताना वॉटरपार्कमध्ये पाण्याची उधळपट्टी होत आहे. तसेच अनेक हॉटेलमध्येही पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. भविष्यातील पाणी कपातीचे संकट टाळण्यासाठी आतापासूनच प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा शहरामध्येही भीषण पाणीटंचाई होऊ शकते. पाणी वाचविण्यासाठी जनजागृती केली. पण वॉटर पार्कमधील उधळपट्टीबाबत गप्प का आहेत असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. (वार्ताहर)
>उन्हाळी हंगामासाठी सर्व तयारी करून ठेवली होती. मात्र, शहरात पाणीकपात असल्याने यंदा वॉटर पार्क बंद ठेवण्यात आला आहे. आयुक्त राजीव जाधव यांनी वॉटर पार्क बंद ठेवण्यास सांगितला आहे. त्यांच्या आदेशाचे पालन केले जात आहे. शहरातील पाणीटंचाईचा विचार केला जात आहे.- डॉ. राजेश मेहता

Web Title: Water scarcity in water park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.