पुणे विभागाला पाणीटंचाईच्या झळा
By admin | Published: March 19, 2017 05:12 AM2017-03-19T05:12:04+5:302017-03-19T05:12:04+5:30
यंदा राज्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस होऊनदेखील उन्हाच्या प्रचंड तडाख्यामुळे मार्च महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे : यंदा राज्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस होऊनदेखील उन्हाच्या प्रचंड तडाख्यामुळे मार्च महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. पुणे विभागात आजअखेर ३५ टँकर सुरू झाले असून, त्यामुळे ३७ गावे व तब्बल १६७ वाड्या-वस्त्यांमधील ७१ हजार ५०३ लोकसंख्या पाणीटंचाईने बांधित झाले आहेत.
विभागात मागील ३ वर्षे सतत दुष्काळ परस्थिती असल्याने अत्यंत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली होती; परंतु यंदा सर्व भागात
चांगला पाऊस झाल्याने बहुतेक
सर्व धरणे शंभर टक्के भरली.
त्यामुळे यंदा पाणीटंचाईच्या झळा मागील दोन वर्षांच्या तुलनेत कमी जाणवतील; परंतु गेल्या काही दिवसांत उन्हाचा तडाखा प्रचंड
वाढला असून, मार्च महिन्यात टँकर सुरू झाले आहेत.
यामध्ये सर्वांधिक २१ टँकर सांगली जिल्ह्यात सुरू झाले असून, पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात
३ टँकर सुरू झाले आहेत.
सातारा जिल्ह्यात १२ टँकर सुरू झाले आहेत. (प्रतिनिधी)