पाणीटंचाईच्या श्रावणातही झळा!

By admin | Published: August 27, 2015 04:48 AM2015-08-27T04:48:13+5:302015-08-27T04:48:13+5:30

भर पावसाच्या दिवसांत पिके करपू लागल्याने पाण्यासाठी ओरड सुरू असून, पिण्याच्या पाण्यासाठीही जिल्ह्यात पुन्हा ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे. २९ टँकरने १५ गावे

Water in the shortage of water! | पाणीटंचाईच्या श्रावणातही झळा!

पाणीटंचाईच्या श्रावणातही झळा!

Next

पुणे : भर पावसाच्या दिवसांत पिके करपू लागल्याने पाण्यासाठी ओरड सुरू असून, पिण्याच्या पाण्यासाठीही जिल्ह्यात पुन्हा ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे. २९ टँकरने १५ गावे व १५९ वाड्यावस्तांवर ५६ हजार ८९१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला टँकर कमी होऊन १९ वर गेले होते. ती संख्या आता २९ झाली आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात पुन्हा १0 टँकर वाढले आहेत. यावरून पाणीटंचाई किती गंभीर होत आहे हे दिसून येते.
शिरूर, दौैंड, इंदापूर व बारामती या तालुक्यांत २५ जूननंतर अद्याप पाऊसच पडला नाही. परिणामी पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.
बारामती तालुक्यात सर्वाधिक १0 टँकरने ४ गावे व ७६ वाड्यावस्त्यांवर २१ हजार २६ लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. हे टँकर गेल्या महिनाभरापासून सुरू आहेत. मात्र, इंदापूर तालुक्यात टँकर गेल्या आठवडाभरात वाढले असून, बारामतीपाठोपाठ ९ टँकरने ५ गावे व १९ वाड्यावस्तांवर १५ हजार २६६ लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे.
पुरंदर तालुक्यात ५ टँकरने १ गाव ५१ वाड्यावस्तांवर १0 हजार ७११ लोकसंख्येला टँकर पाणी
पुरवत आहेत. आंबेगाव तालुक्यात २ तर दौैंड, हवेली, पुरंदर, शिरूर तालुक्यात प्रत्येकी १ टँकर सुरू आहे. (प्रतिनिधी)

टँकरची मागणी करून टँकर मिळत नसल्याची जिल्ह्यात ओरड आहे. जर मागणीप्रमाणे टँकर मिळाले असते तर पाणीटंचाई किती गंभीर आहे, हे समोर आले असते. जिल्ह्याधिकाऱ्यांनी प्रस्ताव द्या चार तासांत मंजूर करू, असे नुकतेच आश्वासन दिले आहे. त्यानुसार पावसाची स्थिती अशीच राहिली तर टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याची शक्यता आहे.

Web Title: Water in the shortage of water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.