मुळशी तालुक्याला टेमघरचे पाणी द्यावे : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 02:10 PM2020-01-07T14:10:03+5:302020-01-07T14:13:01+5:30

बावधन, भुगाव, भुकुम, लवळे, सूस या गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा कोणत्याही प्रकारचा स्रोत नाही.

Water should be provided from temghar dam to Mulshi taluka: Supriya Sule | मुळशी तालुक्याला टेमघरचे पाणी द्यावे : सुप्रिया सुळे

मुळशी तालुक्याला टेमघरचे पाणी द्यावे : सुप्रिया सुळे

Next
ठळक मुद्देमतदारसंघातील रस्त्यांची कामे करण्याची केली मागणी

पुणे : मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून मुळशी तालुक्यातील ४७ वाड्यावस्त्यांना टेमघर धरणातून बावधन, भुकुम आणि भूगाव या गावांना पाणीपुरवठा करावा. मुळशी, दौंड तालुका आणि खडकवासला मतदारसंघातील रस्ते, ओढ्यांवरील साकव, संरक्षण भिंत अशी विविध कामे करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सोमवारी केली.
सुळे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन मतदारसंघातील कामांचा आढावा घेतला. पाणी, रस्ते, रिंगरोड व मेट्रो आदी विषयांचा आढावा घेतला. यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेश कोंढरे, वैशाली नागवडे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बावधन, भुगाव, भुकुम, लवळे, सूस या शहरालगतच्या गावांमध्ये नागरीकरण झाले आहे. या गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा कोणत्याही प्रकारचा स्रोत नाही. त्यामुळे या गावांना पीएमआरडीए मार्फत टेमघर धरणांमधून पाणी पुरवठा करावा, अशी मागणी सुळे यांनी या बैठकीत केली. या विषयावर येत्या महिनाअखेरीस पुन्हा बैठक घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन पीएमआरडीएकडून देण्यात आले.
त्याचबरोबर पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात रस्त्याचे नियोजन करताना पाणंद रस्त्याचा समावेश विकास आराखड्यामध्ये करावा. आहिरे गावास एनडीए हद्दीलगत पर्यायी रस्ता देण्याची व्यवस्था करावी. खडकवासला मतदारसंघातील धायरी कात्रज रस्त्याची रुंदी ३० मीटक ठेवावी, किरकटवाडी-खडकवासला शीव रस्ता दुरुस्त करावा, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मालखेड, खानापूर, मनेरवाडी, खामगाव मावळ, डोणजे, सांगरून, बाहुली, कुडजे, कोंढवे धावडे, कोपरेगाव,गोऱ्हे , खडकवासला, कल्याण, रहाटावडे, गाऊडदरा, गोगलवाडी, आगळंबे, मांडवी, खडकवाडी, किरकटवाडी, नांदोशी, जांभळी, आर्वी या गावांचे पाणंद रस्ते विकास आराखड्यात समाविष्ट करावेत. रिंगरोडसाठी जमीन संपादनापोटी दिल्या जाणाºया हस्तंतरणीय विकसन हक्क (टीडीआर) देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी सुळे यांनी केली.  

Web Title: Water should be provided from temghar dam to Mulshi taluka: Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.