पाणी उजनीत सोडू नये
By admin | Published: November 12, 2015 02:28 AM2015-11-12T02:28:44+5:302015-11-12T02:28:44+5:30
चासकमान धरणाचे पाणी उजनी धरणात सोडण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने एकतर्फी घेतलेल्या निर्णयास स्थगिती मिळावी
रांजणगाव गणपती : चासकमान धरणाचे पाणी उजनी धरणात सोडण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने एकतर्फी घेतलेल्या निर्णयास स्थगिती मिळावी म्हणून दाखल केलेल्या अर्जावर १७ नोव्हेंबरला मुंबई येथे सुनावणी होणार आहे. तोपर्यंत चासकमानचे पाणी उजनी धरणात सोडू नये, असे आवाहन माजी आमदार अशोक पवार यांनी केले आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी पुणे, कार्यकारी संचालक पाटबंधारे विभाग, मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता चासकमान प्रकल्प यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, चासकमान धरणाचे ३.१४ टीएमसी पाणी उजनी जलाशयात सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घेतला आहे तो घेतांना चासकमानच्या लाभार्थ्यांना विचारात घेतले नाही. त्यांना यासंबधी आपले म्हणणे मांडण्याची संधी सुध्दा दिली नसून तो संपूर्णपणे एकतर्फी व चुकीचा घेतला आहे. या निर्णयाविरोधात पवार यांनी लाभार्थ्यांच्या वतीने उच्च न्यायालयात प्राधिकरणाच्या निर्णया विरोधात अपिल करावयाचे असल्याने प्राधिकरणाने त्यांच्या स्वत:च्या पाणी सोडण्याच्या निर्णयास स्थगिती द्यावी यासाठी प्राधिकरणाचे सदस्य सोडल यांचेकडे अर्ज सादर केला होता.
या अर्जातील चासकमानचे पाणी उजनीला सोडण्यासंदर्भातील शेतक-यांच्या भावना अडीअडचणींचा विचार करुन या अर्जाची सुनावणी येत्या १७ तारखेला मुंबई येथे प्राधिकरणाच्या कार्यालयात
होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शिरुर तालुकयातील कोळगाव डोळस, निर्वी, गुनाट, कासारी, भांबार्डे, निमगाव म्हाळुंगी, न्हावरा, खंडाळे, कोंढापुरी, अांबळे, करंजावणे यासह तालुकयातील पश्चिम पटटयातील गावामंध्ये आताच मोठया प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू
लागली आहे. (वार्ताहर)