शिक्रापुरात जलस्रोत आटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:10 AM2021-05-08T04:10:21+5:302021-05-08T04:10:21+5:30
शिक्रापूर परिसरातील अनेक विहिरींनी पाणीपातळी तळ गाठला आहे. गेले काही दिवस येथील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून अनेकांना ...
शिक्रापूर परिसरातील अनेक विहिरींनी पाणीपातळी तळ गाठला आहे. गेले काही दिवस येथील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून अनेकांना पाणी विकत घ्यावे लागत आहेत. याबाबत येथील ग्रामस्थ व घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण करंजे यांनी शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्याकडे वेळ नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
याबाबत आमदार अशोक पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून पाणी सोडण्याबाबत सूचना करणार असून, लवकरात लवकर वेळ नदीत पाणी सोडण्यात येईल. शिक्रापूर व परिसरातील नागरिकांना मे-जून महिन्यात काहीशी पाणीटंचाई जाणवत असते. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या दरवर्षी जाणवते. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी या वेळी अरुण करंजे व ग्रामस्थांनी केली आहे.
--
फोटो क्रमांक : ०७ शिक्रापूर पिण्याचे पाण्याची समस्या
फोटो ओळी : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कोरडी पडलेले वेळ नदीपात्र.