उजनी धरणातील पाणीसाठ्यात १ टक्के वाढ

By Admin | Published: June 10, 2016 06:20 PM2016-06-10T18:20:45+5:302016-06-10T18:20:45+5:30

सोलापूर जिल्ह्यासह पुणे, अहमदनगर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसात ८२ मिमी पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात १ टक्के वाढ झाली आहे़

The water storage in the Ujni dam is 1 percent | उजनी धरणातील पाणीसाठ्यात १ टक्के वाढ

उजनी धरणातील पाणीसाठ्यात १ टक्के वाढ

googlenewsNext


पाणालोट क्षेत्रात ८२ मिमी पाऊस : उजनी मायनस ५१़८१ टक्के
बेंबळे : सोलापूर जिल्ह्यासह पुणे, अहमदनगर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसात ८२ मिमी पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात १ टक्के वाढ झाली आहे़
उजनी धरणाची मायनस पातळी विक्रमी वजा ५२़८२ टक्केपर्यंत खाली गेले होते़ उजनी धरणाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात निचांकी पातळी म्हणून नोंदविली गेली आहे़ मान्सूनपूर्व पावसाने चांगल्या प्रकारे सुरूवात केल्यामुळे उजनी धरणाची खालावत जाणारी पाणीपातळीत प्रथमच वाढ झाली आहे़ गेल्या चार ते पाच दिवसात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची चांगली सुरूवात झाली आहे़ आतापर्यंत ८२ मिमी पाऊस एका दिवसात नोंदविला गेला आहे़ त्यामुळे उजनी पाणीपातळी मायनस ५२़८२ टक्यांवरून मायनस ५१़८१ टक्के इतके झाले आहे़ त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी उजनीच्या पाणीपातळीत वाढ होण्यास लवकरच सुरूवात झाली आहे़ मान्सून दाखल होण्यापूर्वी उजनीत पाणी साठा वाढ झाल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे़
१८ धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस
आतापर्यंत उजनी धरणाच्या वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसास सुरूवात होत असायची़ पण यावर्षी मात्र उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात लवकरच पावसास सुरूवात झाली आहे़ त्यानंतर १८ धरणाची पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला आहे़ त्यामुळे पाणलोट क्षेत्रात जास्त पावसाची नोंद झाली आहे़
धरण क्षेत्रात पडलेला पाऊस
पिंपळगाव : ०़०० टक्के
माणिक डोह : ०़०० टक्के
येडगांव : ७़७१ टक्के
वडज : ३़३८ टक्के
डिभें : ०़१० टक्के
घोड : ०़०० टक्के
कलमोडी : १२़३३ टक्के
चासकामान : ६़६७ टक्के
भामा आसखेड : १९़७९ टक्के
वडिवले : २२़६४ टक्के
आंध्रा : ४५़७४ टक्के
पवना : १५़२१ टक्के
मुळशी : १९़८० टक्के
तरसगांव : ०३़३३ टक्के
पानशेत : ९़०६ टक्के
खडकवासला : ३८़७८ टक्के
उजनी : मायनस ५१़८१ टक्के
विसापूर : ७़८७ टक्के
टेमदार : ०़०४ टक्के़

 

Web Title: The water storage in the Ujni dam is 1 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.