पाण्यासाठी वाल्हेत महिलांचा ठिय्या
By admin | Published: January 6, 2016 12:49 AM2016-01-06T00:49:19+5:302016-01-06T00:49:19+5:30
वाल्हे परिसरामध्ये कमी पर्जन्यमानामुळे परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहे
वाल्हे : वाल्हे परिसरामध्ये कमी पर्जन्यमानामुळे परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहे. जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
तीन वेळा वाल्हे ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी करूनही कोणीच त्याची दखल न घेतल्याने आज आठवडेबाजाराच्या दिवशीच पाणीटंचाईग्रस्त भागातील महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन सरपंचांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये कमी पावसामुळे पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील मधलामळा येथील रणरागिणींनी संतप्त होऊन आज
वाल्हे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन वाल्हे सरपंचानांसमोर प्रश्नांचा भडिमार केला.
या वेळी सुशीला भुजबळ, हेमलता भुजबळ, लक्ष्मी भुजबळ, सुलोचना भुजबळ, शारदा राऊत, नीता भुजबळ, उषा भुजबळ, मंगल भुजबळ उपस्थित होत्या. (वार्ताहर)