गुरुवारी शहराच्या सर्व भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:18+5:302021-06-29T04:08:18+5:30
पुणे : शहरातील सर्व भागांत गुरुवारी (दि. १) संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असून, शुक्रवारी (दि. २) सकाळी उशिरा ...
पुणे : शहरातील सर्व भागांत गुरुवारी (दि. १) संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असून, शुक्रवारी (दि. २) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे़
पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर भामा आसखेड, चिखली रावेत पंपिंग येथील विद्युत व पंपिंग विषय तसेच बांधकामविषयक तातडीच्या दुरुस्तीची कामे करायची आहेत. त्या कारणाने १ जुलै रोजी संपूर्ण पुणे शहराचा दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे़
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
भामा आसखेड जलकेंद्र परिसर :- लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा इत्यादी़
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग) :- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वतीदर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड आदी सर्व भाग.
वडगाव जलकेंद्र परिसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक आदी़
चतु:श्रृंगी / एसएनडीटी/ वारजे जलकेंद्र परिसर :- पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक परिसर, भुसारी कॉलनी, महात्मा सोसायटी, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता आदी़
लष्कर जलकेंद्र भाग :- लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता आदी
नवीन होळकर व चिखली पंपिंग भाग :- विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुळा रोड इत्यादी़
-----------------------