पुणे शहराच्या सर्व भागांतील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 06:26 PM2021-05-17T18:26:37+5:302021-05-17T18:26:43+5:30

शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

Water supply in all parts of Pune city will be closed on Thursday | पुणे शहराच्या सर्व भागांतील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

पुणे शहराच्या सर्व भागांतील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

Next
ठळक मुद्देविद्युत व पंपिंग विषय तसेच बांधकामविषयक तातडीची दुरुस्तीची कामे होणार

पुणे: शहरातील सर्व भागांत गुरुवार (दि. २०) संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि. २१) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे़. पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर, एस.एन.डी.टी./वारजे जलकेंद्र, नवीन होळकर भामा आसखेड, चिखली रावेत पंपिंग येथील विद्युत व पंपिंग विषय तसेच बांधकामविषयक तातडीची दुरुस्तीची कामे करायची असल्याकारणाने २० मे रोजी संपूर्ण पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

भामा आसखेड जलकेंद्र परिसर: लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा.

पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग): शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वतीदर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड आदी सर्व भाग.

वडगाव जलकेंद्र परिसर: हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.

चतु:श्रृंगी/एस.एन.डी.टी./ वारजे जलकेंद्र परिसर: पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक परिसर, भुसारी कॉलनी, महात्मा सोसायटी, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, बावधान, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता.

लष्कर जलकेंद्र भाग:- लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता.
नवीन होळकर व चिखली पंपिंग भाग :- विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुळा रोड.

Web Title: Water supply in all parts of Pune city will be closed on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.