प्राधिकरण परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2015 05:57 AM2015-05-03T05:57:10+5:302015-05-03T05:57:10+5:30
महापालिका क्षेत्रातील प्राधिकरण क्रमांक २३ ते २८ येथे पाण्याचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत
पिंपरी : महापालिका क्षेत्रातील प्राधिकरण क्रमांक २३ ते २८ येथे पाण्याचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. ईआय पाण्याच्या टाकीतून सकाळ व संध्याकाळ दोन वेळा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. हा पुरवठा ६ मे ते जुलै २०१५ अखेरपर्यंत करण्यात येणार आहे, अशी माहिती अ क्षेत्रीय पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंता लियाकत पिरजादे यांनी दिली आहे.
सेक्टर क्रमांक २३ ते २७, २७ अ, व २८ निगडी गावठाण व मुंबई- पुणे रस्त्याचा पश्चिमेकडील भाग, दत्तवाडी, रूपेश कॉलनी, एकतानगर, मारणे बिल्डिंग, सेक्टर २७ अ ओटास्कीम, साईनाथनगर, २५६ गाळे व २७६ गाळे येथे सकाळी व सायंकाळी सेक्टर २६ मध्ये पुरवठा करण्यात येईल.
उन्हाळ्यात सखल भागातील पाण्याचा वापर वाढल्यामुळे उंचावरील व टोकाकडच्या पाण्याच्या दाबामुळे कमी वेळ पाणी मिळण्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. यासाठी पुरेसा पाणीपुरवठा होण्याकरिता पाण्यात कपात न करता विभागानुसार पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)