पुण्यातील 'या' भागात गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 08:41 PM2021-03-01T20:41:31+5:302021-03-01T20:41:59+5:30
पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली माहिती...
पुणे : महापालिकेच्या लष्कर व नवीन होळकर पंपिंग येथील पंपींग, स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे या ठिकाणाहून होणारा लष्कर भाग, पुणे स्टेशन, नगररोड, लोहगाव आदी भागांमधील पाणीपुरवठा गुरुवारी (दि़. ४ मार्च) पूर्ण दिवस बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि़५ मार्च) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
लष्कर जलकेंद्र - लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी इत्यादी़
नवीन होळकर पंपिंग - विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड आदी परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.