पाणीपुरवठ्याचे लेखापरीक्षण
By Admin | Published: August 10, 2016 01:09 AM2016-08-10T01:09:58+5:302016-08-10T01:09:58+5:30
महापालिकेने ४० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून पुढील हप्ते मंजूर करून घेण्यापूर्वी त्रयस्थ संस्थेमार्फेत तांत्रिक लेखापरीक्षण करून
पिंपरी : महापालिकेने ४० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून पुढील हप्ते मंजूर करून घेण्यापूर्वी त्रयस्थ संस्थेमार्फेत तांत्रिक लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत काम होणार आहे. त्यासाठी ९ लाख २० हजार रुपये खर्च होणार आहे.
जेएनएनयूआरएम अंतर्गत मंजूर प्रकल्पासाठी तांत्रिक परीक्षण करण्याबाबत जेएनएनयूआरएम कक्षामार्फत १० जून २०१५ ला पत्राद्वारे कळविले आहे. शासनाच्या नियमानुसार दर तीन महिन्यांनी तांत्रिक लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी सरकारकडील अनुदानाचा पहिला हप्ता महापालिकेला प्राप्त झाला आहे. पुढील हप्ते मंजूर करून घेण्यापूर्वी कामाचे परीक्षण करून अहवाल सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी एका संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी सव्वा नऊ लाख खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.(प्रतिनिधी)