भोर शहराचा पाणी पुरवठा होणार सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:11 AM2021-03-05T04:11:31+5:302021-03-05T04:11:31+5:30
मागिल वर्षेभर भोरला अस्वच्छ व अनियमित पाण्याचा पुरवठा होत होता. स्वच्छ पाण्यासाठी फिल्टरेशन प्लँटसाठी काय उपाययोजना कराव्या लागतील ...
मागिल वर्षेभर भोरला अस्वच्छ व अनियमित पाण्याचा पुरवठा होत होता. स्वच्छ पाण्यासाठी फिल्टरेशन प्लँटसाठी काय उपाययोजना कराव्या लागतील या बाबत आदेश काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेला दिले आहे. पाणी पुरवठा सुरळीत होई पर्यंत भोर शहर राष्ट्रवादी आग्रही राहणार आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, शहराध्यक्ष नितीन धारणे, सुहित जाधव, मयूर भिसे, चेतन जाधव, दानिश शेख उपस्थित होते. भोरमध्ये १३ कोटी ५० लाख रुपयाच्या पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेसाठी १३ टक्के निधी उपलब्ध झाला आहे. तरी हे काम ८५ टक्के पूर्ण होत आले आहे. एप्रिल महिना अखेर शहराचा पाणी पुरवठा सुरुळीत होणार असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला असल्याचे मुख्याधिकारी डाँ. विजयकुमार थोरात यांनी सांगितले.