शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

By admin | Published: October 11, 2016 02:23 AM2016-10-11T02:23:59+5:302016-10-11T02:23:59+5:30

शहरातील बहुतेक जलशुद्धीकरण केंद्रांचे येत्या गुरुवारी (दि.१३) देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने त्यादिवशी संपूर्ण

Water supply to the city closed on Thursday | शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

Next

पुणे : शहरातील बहुतेक जलशुद्धीकरण केंद्रांचे येत्या गुरुवारी (दि.१३) देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने त्यादिवशी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारीही (दि.१४) उशिरा व कमी दाबाने पाणी मिळेल.
पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, लष्कर व एस. एन. डी. टी. जलकेंद्र येथील रॉ वॉटर पंपिंग बंद दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी बंद राहणार आहे. या केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या सर्व भागाला त्यामुळे गुरुवारी पाणी मिळणार नाही.
पाणीपुरवठा बंद असणारा परिसर- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्ममावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वेरोड, एस. एन. डी. टी. परिसर, एरंडवणा, कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, कोंढवा परिसर
वडगाव जलकेंद्र परिसर- हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ.
चतु:शृंगी, एस.एन.डी.टी., वारजे, जलकेंद्र- पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधा नगर, रामबाग कॉलनी, डावीउजवी भुसारी कॉलनी, धनजंय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, सूल, सुतारवाडी, भूगाव रोड,
लष्कर जलकेंद्र- लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, वडगाव शेरी, चंदनगर, खराडी, सोलापूर रस्ता. नवीन होळकर पंपिंग स्टेशन - विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विमानगर, नगर रोड परिसर. (प्रतिनिधी)

Web Title: Water supply to the city closed on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.