नगर रोड परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद
By admin | Published: April 21, 2015 03:08 AM2015-04-21T03:08:26+5:302015-04-21T03:08:26+5:30
महापालिकेचे रावेत जलउपसा केंद्र येथे विद्युत दुरुस्तीची कामे गुरुवारी (दि. २३) करण्यात येणार असल्याने नगर रोड परिसरातील कळस, धानोरी, लोहगाव
Next
पुणे : महापालिकेचे रावेत जलउपसा केंद्र येथे विद्युत दुरुस्तीची कामे गुरुवारी (दि. २३) करण्यात येणार असल्याने नगर रोड परिसरातील कळस, धानोरी, लोहगाव
ग्रामपंचायत, विमानतळ, विमाननगर, संजय पार्क, आपले घर, खांदवेनगर, विद्यानगर, विश्रांतवाडी येथील पाणीपुरवठा २३ एप्रिल रोजी बंद राहणार आहे.
जलउपसा विद्युत केंद्रातील दुरुस्तीची कामे झाल्यानंतर शुक्रवारी (दि. २४) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. तरी या परिसरातील नागरिकांनी बुधवारी पाण्याची साठवणूक करावी अथवा पर्यायी व्यवस्था करावी. (प्रतिनिधी)