शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार, शनिवारी कमी दाबाने येणार पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 02:04 AM2018-12-05T02:04:25+5:302018-12-05T02:04:34+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग; तसेच लष्कर जलकेंद्र येथील विद्युत, पंपिंगविषयक व स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहे;

Water supply to the city will be closed on Friday, the water will come down to less pressure on Saturday | शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार, शनिवारी कमी दाबाने येणार पाणी

शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार, शनिवारी कमी दाबाने येणार पाणी

Next

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग; तसेच लष्कर जलकेंद्र येथील विद्युत, पंपिंगविषयक व स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहे; तसेच पर्वती जलकेंद्र ते लष्कर जलकेंद्र दरम्यान २२०० मि.मी. व्यासाच्या लाइनचे टेस्टिंग व कमिशनिंग करून चालू करण्यात येणार आहे. यामुळे शुक्रवार (दि. ७) रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे; तसेच शनिवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद पर्वती जलशुद्धीकरण केंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वतीदर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, सहकारनगर, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र ४२, ४६ कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टँकर भरणा केंद्र. वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक. चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, बावधन, बाणेर, चांदणी चौक, महात्मा सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरुगणेशनगर. लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, येरवडा परिसर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, मुंढवा, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, गोंधळेनगर, सातववाडी. नवीन होळकर पंपिंग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परिसर.

Web Title: Water supply to the city will be closed on Friday, the water will come down to less pressure on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी