Water Supply : अनियमित पाणी पुरवठ्याची तक्रारी लवकर दुर करणार; आमदार हेमंत रासने यांनी दिल्या सूचना
By राजू हिंगे | Updated: December 3, 2024 15:21 IST2024-12-03T15:16:50+5:302024-12-03T15:21:02+5:30
पाण्याच्या अनियमित वेळा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा तसेच काही भागात अनियमित पाणीपुरवठा या सर्व समस्या आहेत.

Water Supply : अनियमित पाणी पुरवठ्याची तक्रारी लवकर दुर करणार; आमदार हेमंत रासने यांनी दिल्या सूचना
पुणे : कसबा विधानसभा मतदार संघाच्या काही भागात अनियमित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना नागरिकांची पाण्याची तक्रार लवकरात लवकर दूर करण्याच्या सूचना आमदार हेमंत रासने यांनी केली.
पाण्याच्या अनियमित वेळा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा तसेच काही भागात अनियमित पाणीपुरवठा या सर्व समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी पुणे महापालिका पाणी पुरवठा खात्यातील प्रमुख अधिकारी नंदकुमार जगताप यांना सोबत घेत मतदार संघातील विविध ठिकाणी आमदार हेमंत रासने यांनी सकाळी सात वाजता पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यावेळी मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
कचरा मुक्त आणि ट्राफिक मुक्त कसबा करण्यासाठी देखील आम्ही पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहोत. सफाई कर्मचारी सफाई करत असताना त्याच्या हाताला कचरा लागणार नाही असे नियोजन करण्यात येणार आहे. कसबा मतदारसंघातील सर्व प्राथमिक समस्या येत्या सहा महिन्यात सोडविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे असेही रासने यांनी सांगितले.