Pune : शनिवारी पुण्यातील 'या' परिसरातील पाणी पुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 04:17 PM2023-02-22T16:17:27+5:302023-02-22T16:17:53+5:30

शहरातील कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद असणार?

Water supply cut off in katraj uppar indiaranagar area of Pune on Saturday | Pune : शनिवारी पुण्यातील 'या' परिसरातील पाणी पुरवठा बंद

Pune : शनिवारी पुण्यातील 'या' परिसरातील पाणी पुरवठा बंद

googlenewsNext

पुणे : राजीव गांधी पंपिंग स्टेशन कात्रज येथे १२९६ मि.मी. व्यासाच्या दाब जलवाहिनीवर पाण्याचे फ्लो मीटर बसविणेचे काम करण्यात येणार आहे. यामुळे शनिवारी ( दि. २५) कात्रज, अप्पर इंदिरानगर परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच, रविवारी ( दि.२६) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पुणे महापालिका समान पाणीपुरवठा प्रकल्प विभागामार्फत, कोंढवा बुद्रुक येथील केदारेश्वर साठवण टाकी व कात्रज येथील महादेव मंदिर साठवण टाक्यामध्ये येणारे पाणी मोजणेकामी हे फ्लो मीटर बसविण्यात येणार असल्याची माहिती समान पाणीपुरवठा प्रकल्पचे अधिक्षक अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :- कात्रज गावठाण, गुजरफाटा, निंबाळकर वस्ती, उत्कर्ष सोसायटी, भूषण सोसायटी, ओमकार सोसायटी, राजस सोसायटी, बरखडे नगर, माउली नगर, शिवशंभोनगर, गोकुळनगर, सुखसागर नगर भाग-१ व २, साईनगर, गजानननगर, काकडे वस्ती, गंगाधाम शत्रुंजय रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, टिळेकर नगर येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक गावठाण, श्रद्धानगर, पुण्यधाम आश्रम रस्ता, तालाब कंपनी परिसर, लक्ष्मीनगर, आंबेडकर नगर, खडीमिशन परिसर, बधेनगर, येवलेवाडी मुख्य रस्ता, राजीव गांधीनगर, अप्पर इंदिरानगर परिसराचा काही भाग,

Web Title: Water supply cut off in katraj uppar indiaranagar area of Pune on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.