पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 07:42 PM2019-09-03T19:42:23+5:302019-09-03T19:43:11+5:30

जलवाहिनींच्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.

Water supply to East and West areas will remain closed of pune | पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

Next

पुणे : वारजे आणि लष्कर ते खराडी या जलवाहिनींच्या दुरुस्तीची कामे निघाल्यामुळे पुण्याच्या पुर्व व पश्चिम भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 
लष्कर जलकेंद्र ते खराडी येथील एक हजार मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला मुंढवा पासपोर्ट कार्यालय येथे गळती लागली आहे. या जलवाहिनीमधून पाणी पुरवठा होणाऱ्या खराडी, चंदननगर, वडगाव शेरी, सोमनाथनगर, गणेशनगर, खुळेवाडी, रक्षकनगर, चौधरीवस्ती, संघर्ष चौक, थिटे वस्ती, जुना मुंढवा बायपास रस्ता, खराडी बायपास, मारुतीनगर, ईऑन आयटी पार्क परिसर, आपले घर सोसायटी, राजाराम पाटीलनगर, झेन्सार आयटी परिसर, साईनाथनगर, माळवाडी आणि मतेनगर या भागामध्ये गुरुवार (दि. ५) आणि शुक्रवार (दि. ६)  रोजी उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. 
तर चांदणी चौक टाकीच्या मुख्य जलवाहिनी वारजे जलकेंद्राच्या आवारामध्ये नादुरुस्त झाली आहे. ही जलवाहिनी तातडीने दुरुस्त करावी लागणार आहे. या काळात वारजे जलकेंद्र येथील पंपींग बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे चांदणी चौक टाकीला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पयार्याने पाषाण पंपिंग काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उजवी व डावी भुसारी कॉलनी, परमहंस नगर, भूगाव, बावधन, पाषाण, शास्त्रीनगर, बावधन, सूस टाकी, पाषाण गावठाण, सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगे, विधाते वस्ती, मुरकुटे वस्ती, म्हाळुंगे गाव, सुस गाव, सुस रस्ता, मोहननगर आणि परिसरामध्ये शुक्रवारी (दि. ६)  उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आली आहे. 

Web Title: Water supply to East and West areas will remain closed of pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.