गुरुवारी पुणे शहरातील बहुतांशी भागातील पाणीपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 01:16 PM2022-02-01T13:16:42+5:302022-02-01T13:17:32+5:30
पुणे : शहरातील मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये बुधवार दि. २ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजल्यापासून ते गुरुवार दि. ३ फेब्रुवारी ...
पुणे : शहरातील मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये बुधवार दि. २ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजल्यापासून ते गुरुवार दि. ३ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे़ तसेच शहरातील उर्वरित काही भागातील पाणीपुरवठाही गुरुवारी (दि. ३) पूर्ण दिवस बंद राहणार आहे. मध्यवर्ती पेठांसह शहरातील बहुतांशी भागात शुक्रवारी (दि. ४) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
पर्वती जलकेंद्राच्या अखत्यारितील पर्वती एलएलआर टाकीच्या मुख्य जलवाहिनीचे व नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनी जोडण्याचे काम करण्यासाठी तसेच नवीन होळकर व चिखली पंम्पिग भाग, भामा आसखेड जलकेंद्र येथील विद्युत व पंम्पिगविषयक कामे करण्यासाठी गुरुवारी या केंदांवरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे़ यामुळे गुरुवारी संपूर्ण दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार असून, शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने खालील भागाला पाणीपुरवठा होणार आहे़
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
भामा आसखेड जलकेंद्र परिसर :- लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा आदी़
पर्वती (एलएलआर) जलकेंद्र परिसर :- शहरातील सर्व पेठा, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, भवानी पेठ व नाना पेठ.
लष्कर जलकेंद्र भाग :- बेकर हिल जुन्या टाकीवर अवलंबून असणारा कौसर बाग परिसर, एऩआय़बी.एम.रोड, उंड्री रोड, साळुंखे विहार रोड, उजवी बाजू, लोणकर गार्डन परिसर, वानवडी परिसर काही भाग, कोंढवा गावठाण, भाग्योदयनगर, मिठानगर, शिवनेरीनगर, गल्ली क्र. १, सनं ३५४, ब्रम्हा इस्टेट, कृष्णा केबल, फकरी हिल, कुबेरा पार्क, लुल्लानगर संपूर्ण परिसर, जांभूळकर चौक परिसर, विकासनगर, जगतापनगर आदी.
नवीन होळकर व चिखली पंपिंग भाग :- विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, मुळा रोड इत्यादी.