Water News Pune: गुरूवारी पुणे शहराच्या 'या' भागातील पाणीपुरवठा बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 08:58 PM2022-02-21T20:58:02+5:302022-02-21T20:58:16+5:30
शुक्रवार सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार
पुणे : लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीतील सोमवार पेठ ते नरपतगिरी चौक ते १५ ऑगस्ट चौक तर लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्र अंतर्गत रामटेकडी मुख्य जलवाहिनीचे काम करण्यात येणार असल्याने, येत्या गुरुवारी ( दि़ २४ फेब्रुवारी) हडपसर परिसरासह, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, कोरेगाव पार्क मुंढवा भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दि़ २५ फेब्रुवारी रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारा भाग :
लष्कर जलकेंद्रअंतर्गत जलमंदिर झोन मधील संपूर्ण परिसर :- जीई साऊथ, जीई नॉर्थ, पुणे कॅन्टोनमेंटचा हद्दीचा सर्व भाग, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, ताडीवाला रोड परिसर, कोरेगाव पार्कचा संपूर्ण भाग, पुणे स्टेशन परिसर, ससून हॉस्पिटल परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर, गणेशखिंड रोड व परिसर, पाटील इस्टेट, शिवाजीनगर इत्यादी.
लष्कर जलकेंद्रअंतर्गत रामटेकडी झोन मधील संपूर्ण परिसर :- संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, सय्यदनगर हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर ससाणेनगर, काळेपडळ, मुंडबा, माळवाडी, सोलापूर रोड डावीबाजू, केशवनगर, मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, बी.टी. कुबडे रोडवरील काही परिसर, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, ओरीयंट गार्डन साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता, उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराईनगर, मंतरवाडी, ओताडेवाडी इ.