मोठ्या गावांचा पाणीपुरवठा अडचणीत
By admin | Published: May 7, 2017 02:26 AM2017-05-07T02:26:50+5:302017-05-07T02:26:50+5:30
अकस्मात निर्माण झालेल्या या भारनियमनाच्या संकटामुळे फुरसुंगी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन, वाघोलीसारख्या
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : अकस्मात निर्माण झालेल्या या भारनियमनाच्या संकटामुळे फुरसुंगी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन, वाघोलीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजना संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.
गेल्या चार दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीकडून विजेच्या तुटवड्याचे कारण सांगून होत असलेल्या अघोषित भारनियमनामुळे बळीराजासमवेत सर्वसामान्य नागरिकही हैराण झाला असल्याचे चित्र हवेली तालुक्यात दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुळा-मुठा नदीतिरावर असलेल्या कोलवडी या गावात १४ तास तसेच उरुळी कांचन उपविभागातील अष्टापूर, बिवरी, हिंगणगाव, भवरापूर या गावांत नदीजवळ असूनही तसेच कालव्यावर अवलंबून असलेल्या वळती, शिंदवणे, डाळिंब तरडे या गावांतही भारनियमनामुळे शेतीसिंचनासाठी पाणी उचलता येत नाही. प्
ाूर्वी डिझेल इंजिनाचा वापर होत होता. त्यांमुळे विद्युतप्रवाह खंडित झाला तरी पाणी उचलले जात होते. परंतु, आता ती कालबाह्य झाली असून शेतकऱ्यांना विद्युत मोटारींशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विद्युतप्रवाह खंडित झाला की, त्याला वीज येण्याची वाट पाहावी लागते.
या परिसरात मुख्यत्वेकरून मेथी, कोथिंबीर, पालक, फ्लॉवर, कोबी या भाजीपाल्यासह उसाची लागवड केली जाते.
उन्हाळ्यात भाजीपाला जळून जातो. म्हणून कमी पाण्यात जास्त व चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळावे व आपणास चार पैसे जास्त मिळावेत, या उद्देशाने येथील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरून ठिंबक सिंचनाद्वारे पाणी देणे सुरू केले आहे.
ठिंबक सिंचनाद्वारे पाणी रोज द्यावे लागते. यामुळे भर उन्हाळ्यात भरघोस उत्पादन मिळते. परंतु, कसलेही वेळापत्रक जाहीर न करता सुरू झालेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेली नगदी पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.