नीरेच्या पाणीपुरवठाची वीज तोडली अन जोडलीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:46+5:302021-06-26T04:09:46+5:30
नीरा : पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या नीरा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या ठिकाणचे वीज पुरवठा शुक्रवारी सकाळीच तोडण्यात आला. महावितरणचे ...
नीरा : पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या नीरा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या ठिकाणचे वीज पुरवठा शुक्रवारी सकाळीच तोडण्यात आला. महावितरणचे १ कोटी ८५ लाखांंच्यावर असलेेेेेेेेली थकबाकी गेली कितेक वर्ष थकीत ठेवल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज बंद केली. मागील तीन महिन्यापुर्वी अशाच पद्धतीने वीजपुरवठा तोडल्यानंतर किरकोळ रक्कम भरुन पुरवठा पूर्ववत केला. गेली तीन दिवस वितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला गांभिर्याने कल्पना दिली. तरही कोणताच तोडगा न निघाल्यामुळे पुन्हा वीजपुरवठा तोडण्यात आला व अर्ध्याच तासात पुन्हा तो पूर्ववत करण्यात आला.
नीरा ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी गेली दहा ते बार वर्ष पाणीपुरवठाचे कोट्यवधी रुपये थकवले आहेत.
मार्च अखेरला अशा पद्धतीने महावितरण वीजपुरवठा तोडते, त्यानंतर थोडीफार रक्कम भरली जाते व वर्षभर पुन्हा थकबाकी तशीच ठेवली जाते. हे आता नित्याचेच झाले आहे. पुढील दोन दिवस पाणीपुरवठा वितरणावर याचा परिणाम होतो व पुन्हा तो सुरळीत होतो. या वर्षीही मार्च अखेरीला वीजपुरवठा तोडले होते. त्यावेळी पानाला चुना लावल्या प्रमाणे महावितरणची समजूत काढत वेळ मारुन नेली. पण शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला कोणतीच कल्पना न देता वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी धडक नदीत जाऊन पाणीपुरवठ्याची वीज तोडली.