पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 14:44 IST2021-10-19T14:44:10+5:302021-10-19T14:44:20+5:30
गुरुवार,२१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असून, शुक्रवार, २२ रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार
पुणे : शहरातील सर्व भागात गुरुवार, २१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असून, शुक्रवार, २२ रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वती जलकेंद्र पंपींग, रॉ वॉटर पंपींग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर, एस.एन.डी. टी./वारजे जलकेंद, नवीन होळकर भामा आसखेड, चिखली रावेत पंपींग, भामा आसखेड जलकेंद्र येथील विद्युत व पंपींग विषय तसेच बांधकामविषयक तातडीची दुरुस्तीची कामे करायची असल्या कारणाने २१ रोजी संपूर्ण पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.