खडकवासलाच्या मुळा-मुठा उजव्या कालव्यातून होणारा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 04:22 AM2019-02-23T04:22:02+5:302019-02-23T04:22:31+5:30

दौैंड, बारामती, इंदापूर तालुक्यांतील शेतकरी चिंतेत : उन्हाळा शेतीसाठी खूपच कठीण जाणार, पिके जगविणे शेतकऱ्यांना होतेय अवघड

The water supply from the right bank of the Khadakwasla has been closed | खडकवासलाच्या मुळा-मुठा उजव्या कालव्यातून होणारा पाणीपुरवठा बंद

खडकवासलाच्या मुळा-मुठा उजव्या कालव्यातून होणारा पाणीपुरवठा बंद

Next

लोणी काळभोर : हवेली, दौंड, इंदापूर या तीन तालुक्यांतील सहासष्ट हजार हेक्टर क्षेत्रांवरील शेतजमिनीसाठी जीवनदायिनी ठरलेला मुळा-मुठा उजव्या कालव्यातून होणारा व गेला दीड महिना सुरू असलेला पाणीपुरवठा आजपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळातील उन्हाळा या भागातील शेतीसाठी खूपच कठीण जाणार आहे.

हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील सहासष्ट हजार हेक्टर शेतजमिनीला खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार धरणांतीलपाणी मुठा उजव्या कालव्याद्वारे पुरविले जाते. गतवर्षीच्या पावसाळ्यात या चारही धरणांच्या पाणलोटक्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे पुणे शहराला पिण्यासाठी लागणारे पाणी राखून ठेवण्यावर जलसंपदा विभागाचा भर असतो. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये निम्म्यापेक्षा कमी पाणी असल्याने कदाचित उन्हाळ्यात शेतीसाठी अजून एक आवर्तन सुटण्याची शक्यता कमी आहे. यासंदर्भात अजून ठाम निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु हाच निर्णय होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे नव्या मुठा उजव्या कालव्यातील पाण्यावर अवलंबून असणाºया हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील शेतीतील पिके जगवणे शेतकºयांना अवघड होणार आहे. नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे. पावसाळा सुरू व्हायला साधारण चार महिने बाकी आहेत. या चार महिन्यांत शेतीला पाणीपुरवठा कसा करायचा, याची विवंचना शेतकºयांना पडणार आहे.

१० जानेवारीपासून पाणीपुरवठ्याचे हे आवर्तन सुरू होते. ते २० फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहे. पाण्याचा जोरदार उपसा, उन्हाळ्यामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. उन्हाळी आवर्तन व नागरिकांना पिण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांत सध्या निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. टेमघर धरणाचे काम सुरू असल्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नाही. चारही धरणांमधील पाणीसाठा :खडकवासला ५३.१२.,पानशेत - ४५.४३; वरसगाव - ४८.६५ टेमघर - ०.८६. जलसंपदा विभागाने कालव्याद्वारे होणारे आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: The water supply from the right bank of the Khadakwasla has been closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.