पाणीपुरवठा योजनांची जपणूक व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:36+5:302021-05-28T04:09:36+5:30

-- गराडे : भारतात काही ठिकाणी पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. राष्ट्रीय पेयजल योजनेमुळे ग्रामीण भागात सुरक्षित व पर्याप्त ...

Water supply schemes should be maintained | पाणीपुरवठा योजनांची जपणूक व्हावी

पाणीपुरवठा योजनांची जपणूक व्हावी

Next

--

गराडे : भारतात काही ठिकाणी पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. राष्ट्रीय पेयजल योजनेमुळे ग्रामीण भागात सुरक्षित व पर्याप्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उपलब्ध झाला. वाड्यावस्त्यांना पिण्यायोग्य पाणीपुरवठा झाला. पाणीपुरवठा प्रकल्पांची सातत्याने देखभाल करुन पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणे आवश्यक असते. त्यामुळे पाणीपुरवठा योजना दीर्घकाळ टिकून लोकांची सोय होते. पाणीपुरवठा योजनांची जपणूक करावी असे आवाहन पुणे जिल्हा परिषद सदस्य व पुरंदर शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप यादव यांनी केले.

भिवरी ( ता.पुरंदर ) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ६२ लाख रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी यादव बोलत होते.

यावेळी पुरंदर पं.स.सभापती नलिनी लोळे, उपसभापती दत्तात्रय काळे, माजी सभापती दादासाहेब घाटे, उद्योजक हरिभाऊ लोळे, नारायण खळदकर, सरपंच संजय कटके उपसरपंच प्रणोती रा. कटके, ग्रा. पं. सदस्य दिलीप कटके, मारुती कटके, कौशल्या दळवी, सखाराम कटके, संदिप कटके, पोपट दळवी, बाळासाहेब कटके, संभाजी नाटकर, भाऊसाहेब दळवी, अनिल ढवळे, महादेव फडतरे, सचिन दळवी, हनुमंत साळुंके, बाळासाहेब चौधरी, गणेश दळवी, रामहरी कटके, नवनाथ भिसे, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे आदी उपस्थित होते.

उपसभापती दत्तात्रय काळे यांनी यावेळी सांगितले की,आमराई पाझर तलाव ते भिवरी गावापर्यंतच्या दीड किमी पाईपलाईन,पाण्याची टाकी, गावातंर्गत पाणीपुरवठा पाईपलाईन आदी कामे दर्जेदार व टिकाऊ पद्धतीने त्वरित करुन घेणार आहे.

कार्यक्रम प्रास्तविक संजय कटके यांनी केले. गणेश दळवी यांनी सुत्रसंचालन केले.

--

फोटो २७ गराडे पाणीपुरवठा योजना

फोटोओळी : भिवरी (ता.पुरंदर) येथे पिण्याच्या पाणी योजनेचे उद्घाटन प्रसंगी दिलीप यादव, नलिनी लोळे, दत्तात्रय काळे, दादासाहेब घाटे, संजय कटके, प्रणोती कटके आदी.

Web Title: Water supply schemes should be maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.