शिरूरला होणार दिवसाआड पाणीपुरवठा; पाणीसाठ्यात घट
By admin | Published: May 6, 2017 02:03 AM2017-05-06T02:03:57+5:302017-05-06T02:03:57+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने रविवारपासून (६ मे) शहराला
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने रविवारपासून (६ मे) शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
दरम्यान, नगराध्यक्षांच्या शिष्टमंडळाने पुणे येथे कुकडी पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरासाठी धरणातून पाणी सोडण्यासाठी निवेदन दिले.
बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने नगरपरिषदेने परवापासून (दि. ७ मे) दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पाण्याचे आवर्तन मिळण्यासाठी सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा वैशाली वाखारे, पाणीपुरवठा सभापती मुझफ्फर कुरेशी, नगरसेवक विजय दुगड, विठ्ठल पवार, अभिजित पाचर्णे, विनोद भालेराव, रोहिणी बनकर, सुनीता कुरंदळे, संगीता मल्लाव, रेश्मा लोखंडे, ज्योती लोखंडे, पाणीपुरवठा विभागप्रमुख भगवान दळवी यांच्या शिष्टमंडळाने पुणे येथे उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्राकार, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, कुकडी पाटबंधारे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते, कार्यकारी अभियंता गणेश नन्नोर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
बेकायदा वाळूउपशामुळे घोड नदीपात्रात प्रचंड मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे पाणी बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास उशीर लागतो.