पाणीपुरवठा गुरुवारी बंद
By admin | Published: July 28, 2015 04:30 AM2015-07-28T04:30:06+5:302015-07-28T04:30:06+5:30
शहरातील पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, लष्कर केंद्र, एसएनडीटी/वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग येथील अत्यावश्यक देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात
पुणे : शहरातील पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, लष्कर केंद्र, एसएनडीटी/वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग येथील अत्यावश्यक देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने शहरात गुरुवारी (दि. ३०) पाणीपुरवठा होणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
जलकेंद्रामध्ये विद्युत, पंपिंग व स्थापत्य विषयक अत्यावश्यक कामे करायची असल्याने पाणीपुरवठा बंद राहील.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे : पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग)- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, कोथरूड.
वडगाव जलकेंद्र परिसर- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक.
चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसर- पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे, वारजे माळवाडी.
लष्कर जलकेंद्र- लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रस्ता परिसर. या भागातील पाणीपुरवठा गुरुवारी होणार नसल्याची माहिती पाणीपुरवठा विभाग (प्रकल्प) अधीक्षक अभियंता मदन आढारी यांनी दिली.(प्रतिनिधी)