वाणेवाडीत कर थकल्याने पाणीपुरवठा बंद

By admin | Published: March 27, 2017 02:27 AM2017-03-27T02:27:33+5:302017-03-27T02:27:33+5:30

वाणेवाडी येथील ग्रामपंचायतीने थकीत करापोटी थेट ग्रामस्थांचा नळपाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला असून

Water supply stopped after the taxation in Vanewadi taxation | वाणेवाडीत कर थकल्याने पाणीपुरवठा बंद

वाणेवाडीत कर थकल्याने पाणीपुरवठा बंद

Next

सोमेश्वरनगर : वाणेवाडी येथील ग्रामपंचायतीने थकीत करापोटी थेट ग्रामस्थांचा नळपाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची सुरुवात रविवारपासून (दि. २६) करण्यात आली.
या महिन्यात सोमेश्वर उपविभागाने अनेक ग्रामपंचायतींचा विद्युत पाणीपुरवठा खंडित केला आहे. ग्रामपंचायतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीवर भर दिला होता. वाणेवाडी ग्रामपंचायतीला घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करापोटी एकूण १८ लाख रुपये येणे बाकी होते. गावाच्या विकासासाठी नेहमीच पुढे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तरुणांनी ग्रामस्थांमध्ये आठ ते दहा दिवसांपासून जनजागृती केल्याने तब्बल १० लाख ५० हजारांची थकबाकी जमा केली.
रविवारी (दि. २६) वॉर्ड क्रमांक १ आणि २ मधील चालू बाकी सोडून मागील थकीत बाकी असणाऱ्या ९ ग्रामस्थांचा नळपाणीपुरवठा बंद करण्यात आला. मागील सर्व थकीत बाकी भरल्यानंतर हा नळपाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. तसेच सर्व वाड्या-वस्तीवरील आणि गावातील नागरिकांनी आपली थकीत असणारी बाकी या महिनाअखेर ग्रामपंचायतीकडे भरण्याचे आवाहन सरपंच उषा चौगुले यांनी केले आहे.
सरपंच उषा चौगुले, उपसरपंच अनघा भोसले, ग्रामसेवक डी. जी. बालगुडे, सदस्य संजय चव्हाण, शशिकांत जगताप, दत्तात्रय चव्हाण, जितेंद्र जगताप, अनिल यादव, संतोष चौगुले, रोहिदास गोळे, नवनाथ भोसले, राजेंद्र घोरपडे उपस्थित होते.

Web Title: Water supply stopped after the taxation in Vanewadi taxation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.