पुरंदर उपसा योजनेच्या पंपांना पाणीच पुरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:13 PM2019-04-02T23:13:11+5:302019-04-02T23:13:23+5:30
पाणी मागणीत वाढ : मात्र वेळेवर मिळेना, पिके जळाली
भुलेश्वर : पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पंपांना पाणी पुरत नसल्याने नाईलाजास्तव ही योजना वारंवार बंद करावी लागते. यामुळे पाण्याची मागणी वाढवूनदेखील वेळेवर पाणी मिळत नाही. यामुळे पिके जळाली आहेत. पंपांना लेवल येऊन ही योजना सोळा तासांनंतर सुरू झाली.
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे तीन पंप सुरू झाल्यानंतर पुरंदर तालुक्यातील १४४५०, दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६४९८ असे २५४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सध्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे उन्हाळी हंगामातील पाणी सुरू आहे. राज्यातील अनेक पाणीपुरवठा योजना वीजबिलाच्या थकबाकीमुळे अडचणीत आल्या आहेत. यामुळे राज्य शासन उपसा सिंचन एकूण वीजबिलाच्या ८१% भार सोसत असून, लाभार्थी शेतकऱ्यांनी १९% रक्कम भरून पाणी घेत आहे. यामुळे यंदा पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
मुळा-मुठा नदीवर ढापे बसवणे गरजेचे
४पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याची नदीवरील लेवल व्यवस्थित टिकवायची असेल तर आॅक्टोबर महिन्यात मुळा-मुठा नदीवर ढापे बसवणे गरजेचे आहे. यामुळे पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात साठवण्यात मदत झाली असती. मात्र पाणी साठवण्याचे काम उशिरा करण्यात आले. यामुळे तिसºया पंपाला मुहूर्त साधता आला नाही. यंदा दोन पंपांद्वारे पाणी देण्यात आले.
४यंदा मार्च महिनाअखेरीस दोन पंपही चालणे मुश्कील झाले. पाण्याची लेवल वारंवार कमी होत असल्याने एक पंप बंद करण्यात आला, तर एकच सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी पाणी लेवल एकदम कमी झाल्याने ही योजना बंद करण्यात आली.
४माळशिरस वितरिका, राजेवाडी वितरिका व दिवे वितरिकेला पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र एका पंपालादेखील पाणी पुरेल एवढाही पाणीपुरवठा नदीतून साठवण होत नाही. त्यानंतर काही तासांतच नदीवरील पाण्याची लेवल कमी झाल्याने चालू असणारा दुसरा पंपही बंद करण्यात आला. यामुळे पाणी लेवल कमी झाल्याने ही योजना बंद करण्यात आली.
४पाण्याची मागणी भरमसाट वाढली असताना योजना बंद होत असल्याने पाणीवाटप करायचे कसे, हा प्रश्न अधिकारीवर्गाला पडला आहे. सोळा तासांनंतर नदीवरील पाण्याची लेवल जागेवरती आल्यानंतर ही योजना नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आली आणि शेतकऱ्यांच्या चेहºयावर हास्य फुलले.