Pune Water Supply: शहरातील कल्याणीनगर ,कळस भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
By राजू हिंगे | Published: February 26, 2024 05:03 PM2024-02-26T17:03:12+5:302024-02-26T17:03:46+5:30
शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता
पुणे : भामा आसखेड प्रकल्पाचे अखत्यारीतील कुसमाडे वस्ती येथील नवीन टाकी ही मुख्य जलवाहिनीस जोडणे व ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे आहे . त्यामुळे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा गुरुवारी दि.२९ बंद राहणार आहे. या सर्व भागाला शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग पुढील प्रमाणे
आदर्शनगर , कल्याणीनगर , हरीनगर , रामवाडी , शास्त्रीनगर,संपूर्ण गणेशनगर म्हस्के वस्ती परिसर ,कळस ,माळवाडी ,जाधव वस्ती ,विशाल परिसर , विश्रांतवाडी स. नं. ११२ अ ,कस्तुरबा , टिंगरेनगर पंप ते विश्रांतवाडी चौक , जयजवान नगर , जय प्रकाशनगर ,संजय पार्क ,एयर पोर्ट ,यमुना नगर ,दिनकर पठारे वस्ती ,पराशर सोसायटी , श्री. पार्क , ठुबे पठारे नगर