Pune Water Supply: पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 04:41 PM2022-11-21T16:41:55+5:302022-11-21T16:42:05+5:30

शुक्रवारी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार

Water supply to most parts of the city closed on Thursday | Pune Water Supply: पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद

Pune Water Supply: पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद

googlenewsNext

पुणे: शहरातील पर्वती जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्रासह, एसएनडीटी पंपिंग स्टेशन येथे महापालिका तातडीने देखभाल दुरूस्ती कामे गुरवारी (दि. २४ ) करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व मध्यवर्ती भागातील पेठा, सिंहगड रस्ता, कात्रज परिसर, नगररस्ता, हडपसरचा काही भाग, तसेच औंधभागासह कोथरूड परिसरातील काही भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे. या सर्व भागाला दुसऱ्या दिवशी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भागपुढील प्रमाणे

पर्वती एमएलआर टाकी :- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.पर्वती एचएलआर टाकी परिसर, सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग- 1व 2 लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेंसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं 42,46 ( कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर.

पर्वती एलएलाअर परिसर : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.

एस.एन.डी.टी. एम. एल. आर. टाकी परिसर : एरंडवणा, कर्वेरोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, हैपी कॉलनी, गोसावी वस्ती, मयूर कॉलनी, सहवास सोसा परिसर गिरीजा शंकर विहार, दशभुजा गणपती परिसर, वकील नगर, पटवर्धन बाग, डीपी रोड, गुळवणी महाराज रोड, गणेशनगर, राहुल नगर, करिष्मा सोसा, संगमप्रेस रोड, सिटी प्राईड परिसर, आयडीयल कॉलनी इ.

चतुःश्रृंगी टाकी परीसर : औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्री सोसयटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंध गाव परिसर.

लष्कर जलकेंद्र भाग : लष्कर भाग, स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.

वडगाव जलकेंद्र परीसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग धनक कात्रज, वरील भाग, आंबेडकरनगर, टिळेकरनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर.

Web Title: Water supply to most parts of the city closed on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.