Pune Water Supply News: पर्वती, सहकारनगर, कात्रजचा पाणीपुरवठा गुरवारी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 12:24 PM2024-02-07T12:24:46+5:302024-02-07T12:26:15+5:30
शुक्रवारी (९ फेब्रुवारी) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार
पुणे : शहरातील पर्वती, बिबवेवाडी, सहकारनगर, पद्मावती, कात्रज, धनकवडी आदी भागातील पाणीपुरवठा येत्या गुरुवारी (८ फेब्रुवारी) रोजी बंद राहणार आहे. पर्वती येथील पाण्याच्या टाक्यांची विद्युत व पंपिंगविषयक तसेच स्थापत्य विषयक काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (९ फेब्रुवारी) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे
पर्वती जलकेंद्र अंतर्गत- पर्वती एचएलआर (गोल व चौकोनी) टाकी परिसर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द),पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वतीदर्शन, तळजाई, कात्रज परिसर, धनकवडी परिसर आदी.