पुण्याचा पाणी पुरवठा गुरुवारी सुरू राहणार; पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर बदल
By राजू हिंगे | Published: August 7, 2023 07:16 PM2023-08-07T19:16:53+5:302023-08-07T19:17:56+5:30
गुरूवारी पाणी पुरवठा सुरू राहणार आहे...
पुणे : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. यांच्याकडून, २२०/२२ केव्ही पर्वती सबस्टेशन येथे तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी ( दि. १०) पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन) व अखत्यारीतील पंपींग, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी पंपींग व वडगाव जलकेंद्रातुन होणाऱ्या भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने गुरूवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रदद करण्यात आला आहे. त्यामुळे गुरूवारी पाणी पुरवठा सुरू राहणार आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणात २५ टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे काही दिवसापुर्वी पुण्याची दर गुरूवारी असणारी पाणी कपात रदद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर केवळ मागील गुरूवारी पाणी पुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर येत्या गुरूवारी पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन) व अखत्यारीतील पंपींग, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी पंपींग व वडगाव जलकेंद्र येथे तातडीने विघृत देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे पालिकेने जाहीर केले होते.
पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महावितरणशी चर्चा केली. त्यामुळे गुरूवारी जलकेंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत राहणार आहे. त्यामुळे महापालिकेचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद ठेवण्याचा निर्णय रदद करण्यात आला आहे.