Pune: पुणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 11:25 AM2023-07-11T11:25:52+5:302023-07-11T11:26:45+5:30

सर्व भागाला शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता...

Water supply to some parts of Pune city will remain closed on Thursday; Change in water supply schedule | Pune: पुणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल

Pune: पुणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल

googlenewsNext

पुणे : वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत/पंपिंग विषयक व स्थापत्यविषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी (दि.१३) बंद राहणार आहे. सर्व भागाला शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे

वडगाव जलकेंद्र परिसर :-

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

राजीव गांधी पंपिंग :-

सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदा मातानगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजीनगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर मधील भाग क्रमांक एक व दोन, राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग ३८ मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग ४१ व येवलेवाडी परिसर इ.

या भागात मंगळवार, बुधवार व शुक्रवार ते रविवार १६ जुलैपर्यंत संपूर्ण भागाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या भागासाठी पाणी कपात असणार नाही. येत्या सोमवारपासून पूर्वीच्या नियोजनासह सर्व भागांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Water supply to some parts of Pune city will remain closed on Thursday; Change in water supply schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.