Pune: उद्या पुणे शहरात 'या' भागातील पाणीपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 12:12 PM2022-10-05T12:12:14+5:302022-10-05T12:12:36+5:30
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे...
पुणे : महापालिकेकडून विद्युतविषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (दि. ६) कोथरूड, बाणेर, बालेवाडी या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर शिवाजीनगर, औंध, खडकी, नगर रस्ता, सहकारनगर आणि पद्मावती भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. ७) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
या भागात राहणार पाणी बंद
वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी : कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 ते 11, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. 1 ते 10
एसएनडीटी (एचएलआर व एमएलआर टाकी) : गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडारवाडी, स्टेट बॅंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजसनगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदानगर, जयभवानीनगर, रामबाग कॉलनी, हनुमाननगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसलेनगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, आपटे रोड, घोले रोड, सेनापती बापट रोड, पंचवटी, गणेशनगर, एरंडवणा, एसएनडीटी परिसर, कर्वे रोड, खडकी परिसर, हनुमाननगर, जनवाडी, वैदूवाडी, संगमवाडी इत्यादी.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग : मुळा रोड, खडकी कँटोन्मेंट संपूर्ण परिसर, एमईएस, एचई कंपनी, हरिगंगा सोसायटी इत्यादी.
चतुःशृंगी टाकी परिसर : औध, बोपोडी, भोईटेवस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमान श्री सोसायटी, नॅशनल सिंध सोसायटी, औंध गाव परिसर.
पर्वती एचएलआर टाकी : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग-१ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलिसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स. नं. ४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर.