Pune | सोमवारी पुण्यातील 'या' भागातील पाणीपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:39 PM2023-02-18T13:39:43+5:302023-02-18T13:40:02+5:30
मंगळवारी (दि. २१) कमी दाबाने व उशिराने पाणीपुरवठा होणार....
पुणे : फ्लो मीटर बसविण्याबरोबरच वारजे जलकेंद्रावरून चांदणी चौक टाकी येथे येणाऱ्या एक हजार मिलिमीटर व्यासाच्या मुख्य वाहिनीची गळती रोखण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी (दि. २०) बाणेर, बालेवाडी, चांदणी चौक परिसरासह कोथरूडच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर मंगळवारी (दि. २१) कमी दाबाने व उशिराने पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूद्ध पावसकर यांनी याबाबत माहिती दिली.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग : बाणेर-पाषाण लिंक रोड, गणराज चौक, बाणेर हिल, सदानंद चौक, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सैंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनीत चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेशनगर, सुरजनगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीवन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लमाण तांडा, मोहननगर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर इत्यादी.
वारजे जलकेंद्र : अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर -कोंढवे धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे.