वडगाव, कात्रज, आणि धनकवडी भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 08:58 PM2021-02-22T20:58:48+5:302021-02-22T20:58:57+5:30
शुक्रवारी (दि. २६ फेब्रु) रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता
Next
पुणे : वडगाव जलकेंद्र येथील विद्युत पंपीग विषयक दुरूस्तीचे काम करावयाचे असल्याने, वडगाव, कात्रज, धनवकडी व परिसरात गुरूवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. २६ फेब्रु) रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा व मलनि:सारण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक व परिसर.
----------------------------------