पाणीपुरवठा गुरुवारी बंद, जलकेंद्र व पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:58 AM2018-02-06T00:58:57+5:302018-02-06T00:59:04+5:30

पर्वती जलकेंद्र पंपिंग स्टेशन, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग येथे विद्युत, पंपिंग आणि स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्तीचे काम तातडीने करायचे असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. ८) बंद ठेवण्यात येणार आहे.

Water supply will be closed on Thursday, water supply and pumping station repairs | पाणीपुरवठा गुरुवारी बंद, जलकेंद्र व पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे काम

पाणीपुरवठा गुरुवारी बंद, जलकेंद्र व पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे काम

Next

पुणे : पर्वती जलकेंद्र पंपिंग स्टेशन, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग येथे विद्युत, पंपिंग आणि स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्तीचे काम तातडीने करायचे असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. ८) बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे शुक्रवारी देखील पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
शहरातील बहुतेक सर्व परिसराताली पाणीपुरवठा बंद राणार आहे. यात सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट, पर्वतीदर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वेरस्ता ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं. ४२, ४६ (कोंढवा खुर्द), पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक परिसर, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेश नगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे-माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण केंद्राचा परिसर, औंध, बाणेर, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता परिसर, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, लष्कर भाग, पुणे रेल्वेस्थानक, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर आणि नगर रोड परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत नागरिकांनी योग्य ती दखल घेण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
>गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्यामुळे शुक्रवारीदेखील पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने सुरू राहील.

Web Title: Water supply will be closed on Thursday, water supply and pumping station repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी