‘जलयुक्त शिवार एक चळवळ व्हावी’
By admin | Published: October 16, 2015 01:13 AM2015-10-16T01:13:10+5:302015-10-16T01:13:10+5:30
दुष्काळी परिस्थितीवर जर मात करायची असेल, तर जिरायती भागातील प्रत्येक गावात जलसंधारणाची भरीव कामे होणे गरजेचे असुन गावातील वाहून जाणारे पाणी गावातच अडविल्यास पाणीटंचाईचे निवारण होणे शक्य होईल
वासुंदे : दुष्काळी परिस्थितीवर जर मात करायची असेल, तर जिरायती भागातील प्रत्येक गावात जलसंधारणाची भरीव कामे होणे गरजेचे असुन गावातील वाहून जाणारे पाणी गावातच अडविल्यास पाणीटंचाईचे निवारण होणे शक्य होईल. यासाठी शासनाने सुरू केलेले जलयुक्त शिवार अभियान ही एक चळवळ होणे गरजेचे आहे, असे मत कुसेगावचे सरपंच मनोज फडतरे यांनी बंधाऱ्याच्या पाणीपूजनाप्रसंगी व्यक्त केले.
कुसेगाव हे दौंड तालुक्याच्या जिरायत भागामध्ये येणारे गाव असून, आजही या गावाच्या परिसरात पुरेसा पाऊस न झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी गावाच्या काही भागामध्ये मध्यम पाऊस होऊन त्या परिसरातील ओढ्यावर असलेले बंधारे या पावसाच्या पाण्याने भरले. त्यामुळे या बंधाऱ्यालगतच्या विहिरींच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल.
बऱ्याच दिवसांनी बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा झाल्याने या बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन सरपंच मनोज फडतरे व ग्रामस्थांनी केले. दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन दादासाहेब शितोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रमेश भोसले, दादा सोनवणे, अंकुश भोसले, मधुकर शितोळे, सुरेश भोसले, संपत भोसले, राजेंद्र भोसले, दिलीप शितोळे, सोमनाथ भोसले, मानसिंग शितोळे, प्रल्हाद भोसले, शिवाजी शितोळे, दत्तात्रय भोसले, अंकुश भोसले, संदीप भोसले, प्रकाश लोणकर या वेळी उपस्थित होते.