बांधकामासाठी पाण्याची चोरी
By admin | Published: December 22, 2016 01:59 AM2016-12-22T01:59:14+5:302016-12-22T01:59:14+5:30
कार्ला, मळवली परिसरातून गेलेल्या इंद्रायणीचे पाणी बांधकामासाठी काही जण चोरून वापरत आहेत. मात्र, जलसिंचन खात्याचे
कार्ला : कार्ला, मळवली परिसरातून गेलेल्या इंद्रायणीचे पाणी बांधकामासाठी काही जण चोरून वापरत आहेत. मात्र, जलसिंचन खात्याचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
ज्या वेळी इंद्रायणी नदीच्या आजूबाजूला बहुतांश शेतकरी शेती करत होते, तेव्हा व्हा मुबलक पाणी शेतीला मिळत नव्हते. आता मात्र, बांधकामासाठी भरपूर पाणी मिळत आहे. पूररेषेच्या कायद्याच्या अगोदर आपल्या जागेची बिगरशेती म्हणून नोंद करून घेतलेल्या जागांवर मोठमोठी बांधकामे उभी राहत आहेत. अशा बांधकामांकरिता व बागेकरिता इंद्रायणी नदीचे पाणी चोरून काही जणांकडून मुबलकपणे वापरले जात आहे. काहीजण तर इंद्रायणीचे पाणी परस्पर विकण्याचाही व्यवसाय करीत आहेत. (वार्ताहर)