उजनी धरणाने गाठला तळ; पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवणार पाणी संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 04:33 PM2021-05-10T16:33:08+5:302021-05-10T16:37:19+5:30

उजनी धरणाच्या पाण्यावर पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक शेती अवलंबून आहे

The water from the Ujani dam reached the bottom; Crisis on farmers in Pune, Nagar, Solapur district | उजनी धरणाने गाठला तळ; पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवणार पाणी संकट

उजनी धरणाने गाठला तळ; पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवणार पाणी संकट

googlenewsNext
ठळक मुद्देधरणातील पाणीसाठा दोन टक्क्यांवर तरी पाणी विसर्ग सुरूचइंदापूरकरांना करावी लागणार पाण्यासाठी पायपीट

इंदापूर :उजनी धरण उशाला अन कोरड घशाला ही बाब इंदापूरकरांना नवीन  नाही. परंतु, गेल्या वर्ष-सव्वा वर्षात राज्यात कोरोना महामारीचे संकट, शासनाचा लाॅकडाऊन व अतिवृृृष्टी व अवकाळी पावसाचे संकट यामुळे बळीराजा आधीच मेटाकुटीला आला आहे. पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.तर कडक लाॅकडाऊनच्या काळात इंदापूरकरांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ येवुन ठेपल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

सोमवारी (दि १०) सकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात २.७० टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. धरणाची पाणी पातळी ४९१.१३५ मीटर इतकी असून उपयुक्त पाणीसाठा १.४४ टीएमसी इतका शिल्लक आहे.तर उजनी धरणातुन सिना-माढा बोगदा २९६ क्युसेस, दहिगाव एलआयएस (फाटा) ८५ क्युसेस, उप कॅनल (फाटा) ६५० क्युसेस, व मुख्य कॅनलमधुन सोलापूरसाठी ३१५० क्युसेसने पाणी विसर्ग गेल्या अनेक दिवसापासुन सुरू आहे.तर सध्या उजनीतुन एकूण ४ हजार १८१ क्युसेसने पाणी विसर्ग सोलापूर भागासाठी सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी एक ते दोन दिवसात खालावत जाण्याची शक्यता आहे. इंदापूर व पूणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दिसुन येत आहे.

उजनी धरणाच्या पाण्यावर पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक शेती अवलंबून आहे. सोलापूर व उजनीच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या भागासाठी धरणातून पाण्याचे आवर्तन पूर्ण करण्यात आले असल्याने सोलापूरला पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाही. पण धरणातील पाण्याने तळ गाठल्याने आधीच आर्थिक संकटाने पूर्णपणे खचून गेलेल्या शेतकर्‍यांकडून उभ्या केलेल्या पिकांना जगविण्यासाठी प्रचंड धडपड सुरू असल्याचे दिसत आहे.मात्र, इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा पाण्याचे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.
——

Web Title: The water from the Ujani dam reached the bottom; Crisis on farmers in Pune, Nagar, Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.