उजनीच्या पाण्याने सोलापूरची तहान भागणार; भीमा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 12:28 PM2020-06-05T12:28:03+5:302020-06-05T12:41:48+5:30

इंदापूर तालुक्यातील भीमा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर असल्याने इंदापूर व माढा तालुक्यातील पिके पाण्याविना धोक्यात आली होती.

The water of Ujini will quench the thirst of Solapur; Discharge of water from Bhima river started | उजनीच्या पाण्याने सोलापूरची तहान भागणार; भीमा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू

उजनीच्या पाण्याने सोलापूरची तहान भागणार; भीमा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देआवर्तन सोडल्याने इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना या फायदा होणार ऐन उन्हाळ्यात तरणार नदीकाठची पीके

पुणे ( बाभूळगाव) : सोलापूर शहर आणि परिसराची पूर्ण तहान भागविणाऱ्या औज बंधारा, तर टाकळी बंधाऱ्यातील पाणी आटल्याने पाण्याचा प्रश्न एैरणीवर आला होता.  यामुळे  सोलापूर जिल्ह्याला वरदायनी ठरलेलेल्या उजनी जलाशयातून हे दोन्ही बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.  
 ऐन उन्हाळ्यात भीमा नदीला पाणी आवर्तन सोडल्याने इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. इंदापूर तालुक्यातील भीमा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर असल्याने इंदापूर व माढा तालुक्यातील पिके पाण्याविना धोक्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या शहरांसह नदी काठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. यामुळे उजनी धरणातून बुधवारी सकाळी भीमानदीत ३२०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. यात टप्प्या- टप्प्याने वाढ करत ६४०० क्युसेक्लने पाणी सोडण्यात येणार आहे.
  सोलापूर शहर व परिसराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडला आहे. त्यामुळे सोलापूर शहरावर पाणीटंचाईचे तीव्र संकट ओढविण्याची शक्यता निर्माण झाली होती. औज बंधारा परिसरातील भीमा नदीवरील टाकळी जॅकवेलजवळ  फक्त ९ फूट  इतकीच पाणीपातळी असून, हे पाणी सोलापूरकरांना जेमतेम आठवडाभर पुरण्याची  शक्यता असल्याने उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधाºयात पोहोचण्यासाठी किमान दहा ते बारा दिवस लागणार आहेत.
  जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी व उजनी अधीक्षक अभियंता धिरज साळे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर, पाणी विसर्ग सोडण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला होता.   सध्या उजनी धरण मृत साठ्यात असून ८.५३ टीएमसी पाणी वापरले गेले आहे. धरणात ५५ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून, या वर्षी उजनी पूर्ण क्षमतेने भरले होते.
   जिल्हाधिकारी यांच्याकडे उजनीचे नियोजन...
     चालू वर्षी २७ नोव्हेंबर २०१९ रोजी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याची पाणीपातळी ४९७.३३० इतकी होती. तर, ४९१ मीटरवरील पाणीपातळी ही उपयुक्त म्हणून गृहीत धरली जाते.  त्याचे संपूर्ण नियोजन जलसंपदा विभागाकडे असते. तर, ४९१ मीटर पातळीच्या खाली उणे पातळी हा मृतसाठा समजला जातो. याचे नियोजन जिल्हाधिकारी यांच्याकडे असल्याने जिल्हाधिकारी हे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी  यांच्याकडून नियोजनाबाबत माहिती घेऊन पाणी सोडण्याचे आदेश देत असतात.
------------------------
 उजनी धरणातील सध्याची पाणीपातळी

उजनी धरणात एकूण पाणीपातळी   ४८९.७३० मीटर
धरणाचे एकूण क्षेत्रफळ  १७४.५७ चौ. कि. मी.
 धरणातील एकूण पाणीसाठा   १५६१.३७  दलघमी
उपयुक्त पाणीसाठा  (उणे २४१.४४ दलघमी
धरणातील एकूण पाणीसाठा   ५५.१३ टी.एम.सी.
उपयुक्त साठा  (उणे) ८.५३ टी.एम.सी.
टक्केवारी  (उणे) १५.९१ टक्के
सध्या सुरू असलेला पाणी विसर्ग.
भीमा नदी - ३००० क्युसेक्स.
मुख्य कॅनाल - २४२२  क्युसेक्स.
भीमा-सीना बोगदा  - ३८० क्युसेक्स.
------------------------

Web Title: The water of Ujini will quench the thirst of Solapur; Discharge of water from Bhima river started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.