पावसाळी पर्यटनासाठी पुण्यातील मुळशीमध्ये गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 03:07 PM2017-07-26T15:07:05+5:302017-07-26T15:14:45+5:30

Waterfall at mulshi, pune | पावसाळी पर्यटनासाठी पुण्यातील मुळशीमध्ये गर्दी

पावसाळी पर्यटनासाठी पुण्यातील मुळशीमध्ये गर्दी

Next

 

पुणे, दि. 26 -  मुळशी तालुका आणि पावसाळी पर्यटन हे एक समीकरणच आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुळशीतील धबधबे खळाळून वाहू लागले आहेत. निसर्गाने हिरवा शालू परिधान केला असून सर्वत्र धुक्याची दुलई पसरली आहे. निसर्गाचे हे विहंगम दृश्य नजरेत टिपण्यासाठी आणि पावसामध्ये भिजण्याची मज्जामस्ती लुटण्यासाठी मुळशीमध्ये पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. 


महाविद्यालयीन तरुण-तरुणींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण भिजण्याचा आनंद लुटत आहेत. विशेष म्हणजे कौटुंबिक सहलींसाठीही मुळशीला प्राधान्य दिले जात आहे. पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या ताम्हिणी घाट, पळसे धबधबा, पौड, डोंगरवाडी, मुळशी धरण आदी भागांमध्ये पर्यटकांची गर्दी होत आहे. केवळ पर्यटकच नाही तर प्रोफेशनल ट्रेकर्सही मोठ्या प्रमाणावर मुळशीकडे आकर्षित होत आहेत. विविध ठिकाणी टेक्स आयोजित करण्यात येत आहेत.

Web Title: Waterfall at mulshi, pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.