भीमा नदीत जलपर्णी कुजली; जलचर धोक्यात
By admin | Published: January 31, 2015 10:49 PM2015-01-31T22:49:19+5:302015-01-31T22:49:19+5:30
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे भीमा नदीपात्रात साखर कारखान्यांची मळी व रसायनयुक्त पाणी सोडल्याने पाणी दूषित झाले आहेत.
मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे भीमा नदीपात्रात साखर कारखान्यांची मळी व रसायनयुक्त पाणी सोडल्याने पाणी दूषित झाले आहेत. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. ही जलपर्णी पाण्यात कुजल्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे हे पाणी वापरण्याऐवजी ते फिल्टरचे पाणी वापरत आहेत.
भीमा नदीवर पारगाव, सादलगाव, मांडवगण या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यात पाणी अडविले आहे. नदीपात्रात येथील कारखान्याचे रसायनमिश्रित पाणी सोडण्यात
आले आहे. यामुळे पाणी दूषित
झाले आहे. याचा परिणाम सर्व बंधाऱ्यांध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे मांडवगण
फराटा तसेच कानगाव बंधाऱ्यातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात
आले आहे.
भीमा नदीमध्ये सध्या पुणे व पिंपरी-चिचंवड महापालिकांचे दूषित केमिकलयुक्त पाणी व त्यात आता भीमा-पाटस कारखान्याची मळी व रसायनयुक्त पाणी सोडण्यात
येत आहे. याचा परिणाम नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. याबरोबरच या कारखान्यातील मळीही पाण्यात टाकली जात असल्याने या
पाण्याला दुर्गंधी सुटली आहे.
(वार्ताहर)
४मांडवगण फराटा (ता. शिरूर)- कानगाव (ता. दौंड) बंधाऱ्याच्या खालील बाजूला पाण्यात मासेमारीचा व्यवसाय चालतो. जलपर्णीमुळे मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज येथील मच्छीमारांनी व्यक्त केली. या ठिकाणी ६० ते ७० कुटुंबे आपला उदरनिर्वाह करीत आहे. येथून दररोज माशांची विक्री होत आहे; परंतु मळीमिश्रित व रसायनयुक्त पाण्यामुळे लहानमोठे मासे मेल्याने हा मासेमारीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.
४ सोसायटी चौकाजवळ ७ ते ८ लहान मुंलाना कांजण्या आल्या आहे. सायंकाळी ५ पासून व सकाळी ६ वाजेपर्यंत डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे दूषित पाणी अघोंळ वा कपडे धुण्यासाठी योग्य नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.